मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

फिरोदिया करंडक

 ऐकताच स्पर्धेचे नाव
पावलांनी घेतली धाव
oditions चा पडदा वर झाला
नाटक पाहण्या रंगमंच आतुरला

synth वर बोटे  फिरली
तबल्यावर थाप पडली
drum set च्या तालावर
ball dance ने बाजी मारली

मृत्तिकेतून शिल्प घडले
मल्लखांब पाहता श्वास रोखले
कुंचल्यातून चित्र रंगले
UV show ला साऱ्यांनी वाखाणले

कितीक झाले रुसवे फुगवे
नयनांनी कश्चित ढाळली  आसवे
त्यातूनच हे नाट्य साकारले
करंडक जिंकण्या सर्व समरसले

नव्हते काळाचे भान
अहोरात्र practice मध्ये मग्न
एकच जिद्द अचूकतेची
प्रयत्नांती करंडक जिंकण्याची 

संपला सरावाचा काळ
झाली मग रंग ताल
दिग्दर्शकाचा किंचितसा रोष
चुका टाळताच येई जोश

अंतिम घडी समीप आली
मनी थोडी हुरहूर दाटली
प्रयोग होताच सर्व बेहोष
top 6 मध्ये जाताच होईल जल्लोष