गुरुवार, १९ जुलै, २०१८

आई


सहज केला सर्च गूगल
टाकला शब्द आई
खूप आले रिझल्ट्स
पण मन भरलं नाही

स्वतःच प्रयत्न करून पाहू
जमतय का काही
घेतले पेन हातात
उमटली कागदावर शाई

सुईत ओवावा धागा तशी
लग्न होऊन आली घरात
शाळा होती रोजचीच पण
सुखावली डफळे परिवारात

नोकरी आणि घर सांभाळताना
ती नाही कमी पडली कशात
आजी आजोबा ना सांभाळताना
बाबांची मोलाची साथ

मदतीला धावून येणारे बहिणी नि मेहुणे
पाठिशी खंबीर दीर नि जाऊ
या सगळ्यात वय विसरायला लावते
ती आमची गोंडस श्राऊ

कुलकर्णी आणि गालफाडे परिवारांशी
जुळले जन्मोजन्मीचे नाते
तुझ्या लाडक्या लेकी फुलवतील
तुझ्याचसारखे त्यांचे आनंदाचे घरटे.

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

क्षण


काही क्षण ताजेतवाने
भारलेले उत्साहाने ,
आप्तस्वकीयांच्या भेटीने
 जिवलग मैत्रिणीच्या बोलण्याने

काही क्षण आनंदी
वाटावे अगदी स्वछंदी ,
झुगारुनी वेळेचे बंध
स्वतःच्याच विश्वात होऊ धुंद

काही क्षण कुतूहलाचे
निरुत्तर प्रश्नांचे ,
कुतूहल जपण्याचे
अन् अलगद उलगडण्याचे

काही क्षण फक्त बिनधास्त
मोकळ्या हवेत बागडणे मस्त ,
स्वतःशीच मारता गप्पा
उघडावा आठवणींचा कप्पा

काही क्षण मनाला भिडणारे
काही स्वप्नांच्या आकाशी उडणारे ,
स्वभावच जणू हे क्षणा-क्षणांचे
तुला नि मला भावणारे !

- मधुरा

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

सौंदर्य

रात्र गोजिरी
टिपूर चांदण्याची
आस्मानीचा राजा
भुरळ घाली सौंदर्याची


कुतूहल त्या सौंदर्याचे
कधी कुणा न उमजावे
चिरतरुण सौंदर्य तसे
प्रत्येक प्रियेस लाभावे


दृष्ट न लागो शशी-सौंदर्या
खुद्द आकाशाची
म्हणूनच देवाने निर्मिली
रात्र हि काळ्या रंगाची......:)


सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

पत्रातला आनंद

पत्रातला आनंद


आठ  आण्याच पोस्टकार्ड रुपयाचा पेन
मनातल्या भावना शब्दांत गुंफण्याचा
तो आनंद वेगळाच
पत्रातून व्यक्त होण्याचा

जमाना बदलला रिंग खणखणली
communication साठी अवतार फोनचा

तो आनंद वेगळाच
पत्रातून व्यक्त होण्याचा

फोन झाला smart जो तो online दिसू लागला
chatting च्या युगात पत्रातला आशीर्वाद हरवला
हिरव्या ठिपक्यांच्या गर्दीत प्रयत्न सगळ्यांशी बोलण्याचा

तो आनंद वेगळाच
पत्रातून व्यक्त होण्याचा

ping करणाऱ्याला reply करणे अथवा न करणे
प्रश्न ज्याच्या त्याच्या मर्जीचा

तो आनंद वेगळाच
पत्रोत्ताराची वाट बघण्याचा.........:)


शनिवार, १२ जानेवारी, २०१३

बटण


सकाळचे सात
मोबाईलचा गजर
स्नूझ च बटण
अरे आवर लवकर


जिम ची तयारी
Nike चे शूज
ट्रेडमिल च बटण
काही मिनिटातच हाशहुश


Microwave च बटण
गिझर चा स्वीच
फ्रेश शॉवर बाथ नंतर
टोस्टवर किसलेले चीझ


भरभरून परफ्युम
बुटाचं शायनिंग
लिफ्टच बटण
अन् थोडसं वेटिंग


ऑफीसची बस
जरा झालो निवांत
कानात हेडफोन
तिच्याशी बोलायला हाच एकांत


प्रोजेक्टच टेन्शन
laptop ऑन आणि login
P.M ला झेलणं
थोडसं कठीण


काम आठ तास
परतीचा प्रवास
doorbell च बटण
दिवस होता झकास


यंत्रांची बटणे
त्यांचा मी गुलाम
प्रत्येक दिवस असतो झकास

पण बटण दाबल्याविना होत नाही काम!!!!!....   :)

शुक्रवार, १ जून, २०१२

सलाईन ची सुईआई बाबांची हाक 
सिस्टर ची घाई
९ च्या ठोक्याला
सलाईन ची सुई


दूध अंड्याचा नाश्ता
इंजेक्शन ची syringe
डॉक्टरांचा round
"Madhura how are you feeling??"

औषधांची चिट्ठी
medical ची वारी
दोन वेण्या आणि  sponging
माझी आवराआवरी

चविष्ट अन् पौष्टिक डबा
काकू देई आणून
हॉस्पिटलमध्ये जेवण
तरी होई चाटूनपुसून

dressing ची वेळ 
doctor चा शांत चेहरा
शब्दही इतके शांत की
 patient लगेच व्हावा बरा

मोठी dressing trolley
"सिस्टर bandage सोडा"
"थोडं दुखतंय..पाय अवघडला..
त्याला घट्ट पकडा"

BP... pulse rate मोजा
तोंडात  thermometer
102 fever.....
बर्फाने शेका सिस्टर

डॉक्टरांचा दुसरा  round
" how are you??"
मी बोले
" I'm feeling better now"

थोडसं चालण
अन् रात्रीचं जेवण
"अजून थोडी चाल "
काकाचं प्रोत्साहन

रात्री ९ चा ठोका
मला पेंग येई
antibiotic injection 
आणि परत सलाईन ची सुई......:))


बुधवार, २१ डिसेंबर, २०११

इंद्रधनूचा साज

तांबडा रंग प्रेमाचा
आयुष्यात या रंगणार का?

नारिंगी रंग थंडाव्याचा
ऊब मला तू देणार का?

पिवळा रंग मैत्रीचा
म्हातारपणी टिकणार का?

हिरवा रंग सधनतेचा
शेतकऱ्यांना लाभणार का?

निळा रंग आकाशाचा
चंद्राला कधी कळणार का?

पारवा रंग अनाकलनीय
समजावून मला सांगाल का?

जांभळा रंग रहस्याचा
गूढ विश्वाचे शोधणार का?

सप्तरंगी साज हा इंद्रधनूचा
कवेत घेता कधी येणार का??