सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

XPRESSIONS 2023-24 - Annual day by Makoons Preschool Owla Thane


धम्माल होता आजचा दिवस!!!
मुलांचा annual day म्हणलं की मज्जा येणार हे ओघानं आलंच. तर आज होतं आमच्या चिरंजीवांच्या शाळेचं स्नेह संमेलन.☺️ शाळा म्हणजे खरं तर preschool. पण मोठ्या दिमाखदार सोहळ्यांच्या बरोबरीनं असणारा भव्य सोहळाच होता जणू!!
राष्ट्रगीताने झालेली सुरुवात पारंपरिकपणे दीप प्रज्वलन, ईश-स्तवन करत उत्सुकता शिगेला पोचवत होती. ठाणे शहरातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा रंगमंच तर किती आतुरला असेल ना ? इवलीशी पाऊले, त्यांचे चकचकीत ड्रेस, ठेका असणारी गाणी, teachers ची लगबग आणि audience मधून टाळ्यांचा कडकडाट करणारे पालक !!

आणि परफॉर्मन्स सुरू झाले. सगळी मुले स्टेज वर अजिबात  न घाबरता येत होती आणि छान परफॉर्म करत होती.
खरी मज्जा का आली सांगू? मुलांना ओळीत उभे करेपर्यंत इतर मुलं जी करामत करत होती ना ते पाहून..

 एक मुलगा प्रज्वलित केलेल्या समईवरच फुंकर घालत होता😘
दुसरा कोणी पाठमोरा च उभा!🤣टीचर ने कित्येक वेळा सरळ उभे करुन पण तो परत पाठमोरा च😅
एक जण खूश होऊन जोरात आई आई म्हणून हाक मारत होता तर कोणी बक्षिसाची ट्रॉफी डोक्यावर ठेवत होता.😅
एक जण कॅमेरामन कडे बघत “say cheese” म्हणत एकाजागी उभा😃
कोणी वाक्य विसरला तर “अभी क्या बोलना है” असा मनाचा डायलॉग टाकत हशा पिकवत होता😂

सामाजिक संदेश असणारे, सोशल मीडियाचा परिणाम दाखवणारे, रेट्रो ..सगळेच डान्स , स्किट, होस्ट आणि गेस्ट्स ची भाषणं ,पारितोषिक वितरण सगळच एकदम hit !! याचं आयोजन वर्णन करावं इतकं सुंदर केलं होतं. बारकाईने दिलेल्या सूचना डिसिप्लिन maintain करण्यासाठी उपयोगी येत होत्या. एकंदरीत च शाळेने घेतलेली मेहनत आणि छोट्याशा मुलांनी केलेलं सादरीकरण एकदम झक्कास!!

——✍🏾मधुदीप


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा