बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

क्षण


काही क्षण ताजेतवाने
भारलेले उत्साहाने ,
आप्तस्वकीयांच्या भेटीने
 जिवलग मैत्रिणीच्या बोलण्याने

काही क्षण आनंदी
वाटावे अगदी स्वछंदी ,
झुगारुनी वेळेचे बंध
स्वतःच्याच विश्वात होऊ धुंद

काही क्षण कुतूहलाचे
निरुत्तर प्रश्नांचे ,
कुतूहल जपण्याचे
अन् अलगद उलगडण्याचे

काही क्षण फक्त बिनधास्त
मोकळ्या हवेत बागडणे मस्त ,
स्वतःशीच मारता गप्पा
उघडावा आठवणींचा कप्पा

काही क्षण मनाला भिडणारे
काही स्वप्नांच्या आकाशी उडणारे ,
स्वभावच जणू हे क्षणा-क्षणांचे
तुला नि मला भावणारे !

- मधुरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा