रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

सौंदर्य

रात्र गोजिरी
टिपूर चांदण्याची
आस्मानीचा राजा
भुरळ घाली सौंदर्याची


कुतूहल त्या सौंदर्याचे
कधी कुणा न उमजावे
चिरतरुण सौंदर्य तसे
प्रत्येक प्रियेस लाभावे


दृष्ट न लागो शशी-सौंदर्या
खुद्द आकाशाची
म्हणूनच देवाने निर्मिली
रात्र हि काळ्या रंगाची......:)


सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

पत्रातला आनंद

पत्रातला आनंद


आठ  आण्याच पोस्टकार्ड रुपयाचा पेन
मनातल्या भावना शब्दांत गुंफण्याचा
तो आनंद वेगळाच
पत्रातून व्यक्त होण्याचा

जमाना बदलला रिंग खणखणली
communication साठी अवतार फोनचा

तो आनंद वेगळाच
पत्रातून व्यक्त होण्याचा

फोन झाला smart जो तो online दिसू लागला
chatting च्या युगात पत्रातला आशीर्वाद हरवला
हिरव्या ठिपक्यांच्या गर्दीत प्रयत्न सगळ्यांशी बोलण्याचा

तो आनंद वेगळाच
पत्रातून व्यक्त होण्याचा

ping करणाऱ्याला reply करणे अथवा न करणे
प्रश्न ज्याच्या त्याच्या मर्जीचा

तो आनंद वेगळाच
पत्रोत्ताराची वाट बघण्याचा.........:)