शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

असं कॉलेज असावं...

एक छोटंसं कॅन्टीन असावं
वडापावच्या वासानं तोंडाला पाणी सुटावं
तिथे घडलेली कहाणी असावी
ज्यानं चहाची लज्जत वाढावी
असं ...

लायब्ररीतल्या तिचं चित्त पुस्तकात असावं
तिच्याकडे पाहून त्याला eye tonic मिळावं
notes च्या बहाण्याने तिला भेटावं
आणि त्याचं गुपित तिला कळावं
असं ...

जिमखान्यात tt चं table असावं 
खेळता खेळता कधी lecture हि बुडावं
सरांबरोबर एखादी game जिंकावं 
त्यातूनच score करायला शिकावं
असं ...

सगळ्यांना मुग्ध करणारं गाणं असावं
drum set च्या तालावर पावलांनी थिरकावं  
नाटक यशस्वी होताच
अवघा भाव विश्व व्यापावं 
असं ...

सगळ्यांना सामावणारं magzine असावं
क्षण चित्रांना कॅमेऱ्यात टिपावं
नामांकित व्यक्तीना भेटावं
कर्मण्य हे नाव सार्थ करावं
असं ...

गप्पांसाठी  कट्ट्यावर यावं
चेष्टा मस्करीत कुणी आपलं व्हावं
वेळ होताच आपल्या मार्गांवर निघून जावं
आठवणी जपण्यासाठी कॉलेज मध्येच भेटावं 
असं ...

 

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

माणसांची साठवण

आयुष्याच्या वाटेवर
वळण वाकडे येई,
माणूस आपलं होता होता
कधी परतुनी जाई
 
तोंडानिशी ओळख पहिली 
गप्पांत रुपांतरीत,
मुग्धता त्या गप्पांची
जाई नाते फुलवीत
 
गर्भरेशमी नात्यांचे 
नामकरण कधी ना झाले,
एकत्र असता मात्र
मैत्री चे lable लागले 
 
दिवस,महिने,वर्ष सरताच 
खरे रूप कळले,
मैत्री चे lable तरी 
समाधानासाठी लावले
 
मागचे वळण पाहताना 
होते काहींची आठवण,
पण कधी मैत्री ही असते 
माणसांची केलेली साठवण!!!!!