शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

असं कॉलेज असावं...

एक छोटंसं कॅन्टीन असावं
वडापावच्या वासानं तोंडाला पाणी सुटावं
तिथे घडलेली कहाणी असावी
ज्यानं चहाची लज्जत वाढावी
असं ...

लायब्ररीतल्या तिचं चित्त पुस्तकात असावं
तिच्याकडे पाहून त्याला eye tonic मिळावं
notes च्या बहाण्याने तिला भेटावं
आणि त्याचं गुपित तिला कळावं
असं ...

जिमखान्यात tt चं table असावं 
खेळता खेळता कधी lecture हि बुडावं
सरांबरोबर एखादी game जिंकावं 
त्यातूनच score करायला शिकावं
असं ...

सगळ्यांना मुग्ध करणारं गाणं असावं
drum set च्या तालावर पावलांनी थिरकावं  
नाटक यशस्वी होताच
अवघा भाव विश्व व्यापावं 
असं ...

सगळ्यांना सामावणारं magzine असावं
क्षण चित्रांना कॅमेऱ्यात टिपावं
नामांकित व्यक्तीना भेटावं
कर्मण्य हे नाव सार्थ करावं
असं ...

गप्पांसाठी  कट्ट्यावर यावं
चेष्टा मस्करीत कुणी आपलं व्हावं
वेळ होताच आपल्या मार्गांवर निघून जावं
आठवणी जपण्यासाठी कॉलेज मध्येच भेटावं 
असं ...

 

४ टिप्पण्या:

  1. vahicha magcha pananvar lihilelya, room madhe vachlelya ya kavita blog varyetyet.. nice :)
    e dainandini hoti tuzi, tyat ani baryach kavita hotya,tya vachaycha pratikshet ahe.

    उत्तर द्याहटवा
  2. its an amazing .....
    its each n every word draw back to my college....
    thx for such nice experience...

    उत्तर द्याहटवा
  3. वाह..! चित्रदर्शी कविता.. प्रत्येकाने जगलेली, तुम्ही पुन्हा जगवलीत!
    ऑर्कुट वर एक "मराठी कविता" म्हणून समूह आहे.. सदस्य व्हावे.. नक्कीच खूप आनंद मिळेल.. आपल्याला व इतरांनाही.
    इथे:
    http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=826350

    उत्तर द्याहटवा