बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

माणसांची साठवण

आयुष्याच्या वाटेवर
वळण वाकडे येई,
माणूस आपलं होता होता
कधी परतुनी जाई
 
तोंडानिशी ओळख पहिली 
गप्पांत रुपांतरीत,
मुग्धता त्या गप्पांची
जाई नाते फुलवीत
 
गर्भरेशमी नात्यांचे 
नामकरण कधी ना झाले,
एकत्र असता मात्र
मैत्री चे lable लागले 
 
दिवस,महिने,वर्ष सरताच 
खरे रूप कळले,
मैत्री चे lable तरी 
समाधानासाठी लावले
 
मागचे वळण पाहताना 
होते काहींची आठवण,
पण कधी मैत्री ही असते 
माणसांची केलेली साठवण!!!!!

५ टिप्पण्या: