सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

दिवाळी

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔


मातीच्या ,रंगवलेल्या ,काचेच्या अन मेणाच्या ,

शांत तेवणारी ज्योत कवेत घेणाऱ्या ,

जमिनीवर राहून आकाशाकडे प्रकाश देणाऱ्या ,

रांगोळीत विराजमान होऊन अंगण उजळणाऱ्या ,

नाजूकश्या पणत्या ... 🪔


झिरमिळ्यांचे ,षट्कोनी, खणाचे trendy ,

स्वतःच्या हाताने घरीच केलेले छोटेसे handy ,

रांगोळीच्या बरोब्बर वर टांगलेले ,

वाऱ्याच्या झुळूकेवर अलगद झुलणारे ,

ठसकेबाज आकाशकंदील ... 🏮


आकाशात झेपावणारे ,नभी उजळणारे ,

जमिनीवर प्रकाशाची रांगोळी रेखणारे ,

नानाविध आकाराचे,आवाजाचे,शोभेचे,

छोट्या-मोठ्यांच्या आवडीचे ,

दणकेबाज फटाके ... 🎇


गरम तेलाच्या डोहात विसावणारी,

वेटोळाकार काटेरी चकली ,

काजू-बेदाण्यातून smiley face करून ,

चवीने भुरळ पडणारा गरगरीत बेसन लाडू ,

कातण्याने कातून आकार मिरवणाऱ्या 

खाऱ्या-गोडया शंकरपाळ्या , करंज्या ,

शेंगदाणे,खोबरे,डाळं,कढीपत्ता ,पोहे 

सगळ्यांना आपलासा करणारा चिवडा ,

खसखशीची पावडर लावणारे अनारसे ,

एकातून अनेक पदर असलेले चिरोटे 

असा चविष्ट फराळ ... 🧆


सूर्याला साद घालणारी पहाट ,

चार कोपऱ्यात रांगोळीने सजलेला पाट ,

चंदनाचं सुवासिक उटणं ,

हातात न मावणारा गोलूमोलू मोती साबण ,

आई-आजीच्या हातून वासाच्या तेलाने 

केला जाणारा अभ्यंग आणि औक्षण ,

आणि 

देवापुढे समई - उदबत्तीच्या साक्षीने 

नतमस्तक होणारे आपण ... 🙏🏻


रम्य वातावरणात,जल्लोषात,धूमधडाक्यात 

साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या परंपरेला जपत ,

सर्वांच्या आरोग्य ,आनंद,सुख,समाधान,शांती साठी 

प्रार्थना करूया ... 👏🏻


दिवाळी २०२१ च्या खूप शुभेच्छा !!🎉


- मिहिर ,मधुरा ,तुषार

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

जय गिरनारी

🌼🙏🏻 जय गिरनारी 🙏🏻 🌼


 नि:शंक हो ,निर्भय हो , मना रे 

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे 

अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी

अशक्य ही शक्य करतील स्वामी ... 🌷


या प्रार्थनेमुळे मिळालेले बळ ,मनाचा निश्चय , देवयानी टीमची साथ आणि श्रीदत्तगुरुंची साद !!


रात्री ११ वाजता गुरुशिखर चढणारी पाऊले , भक्तबंधू-भगिनींची साथ ,कोणी मागे-पुढे ,मधूनच पायऱ्यांवरील आकडे ,पौर्णिमेचा चंद्रमा , थोडी भीती वाटेल असे आवाज ,थंडगार वारा यांचा अनुभव घेत गुरुशिखर चढणे केवळ अविस्मरणीय ... ✨

एक एक पायरी पायी चढून सूर्योदयाबरोबर ब्रम्हमुहूर्तावर श्रीदत्त पादुकांचे दर्शन घेतल्यावर वाटलेले समाधान शब्दांत काय वर्णावे ?🌅🙏🏻


अशा या शब्दातीत अनुभवामध्ये सिंहाचा वाटा देवयानी आणि टीमचा. संपूर्ण यात्रेत केलेली नियोजनबद्ध जेवणाची , नाश्त्याची ,वेळेची ,रेल्वेप्रवासाची सोय आम्हाला खूपच आवडली. विशेषतः सर्वांशी अदबीने आणि कुटुंबवत्सलपणे वागून सर्व सूचना योग्य प्रकारे देणे. धन्यवाद देवयानी ,हिमांशू ,सपना 👍🏻


*दिशा न कळती या अंधारी 

नसे आसरा नसे शिदोरी 

कंठ दाटला आले भरुनी लोचन काठोकाठ l


भुकेजलो मी तहान लागे 

पुढे जाऊ कि परंतु मागे 

ये श्रीदत्ता सांभाळी मज, दावी रूप विराट l

ll गुरुविण कोण दाखवील वाट ll*🙏🏻🌷


या यात्रेबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि पुढील कार्यसेवेसाठी खूप शुभेच्छा !💐


-श्री सुरेश व सौ हेमलता गालफाडे ( जळगाव )

✍🏾मधुदीप

Mi lihun dilela message 👆🏻

अंबे ला

 "अंबे ला घेऊन जाऊ"..."अंबे ला घेऊन जाऊ"...

स्वयंपाक घरातून सगळी कामे आटपून हुश्श करत मी हॉलमध्ये आले तर "अंबे ला घेऊन जाऊ" चा हट्ट बाळराजे करत होते. दिवसभर वर्क फ्रॉम होम आणि वर्क फॉर होम करून सुद्धा फ्रेश असलेल्या बाबांना मात्र ते वाक्य काही समजत नव्हते. शेवटी बाबांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे "आंबे आणायला जाऊ" असा अर्थ घेऊन मिहिरला विचारले..."आंबे आणायला जाऊ या का?" हे ऐकताच आपण किती वेळा सांगून पण कसे कळत नाही असे एक्सप्रेशन्स देत परत तेच बोबडे बोल त्या चिमुकल्या ओठांत तसेच....


मी पण अवाक्! खेळायला येणाऱ्या बालचमू मध्ये आद्या, आराध्या, आभा असतात. पण हि अंबा कोण असेल बरं??

माझा आपला स्वतःशीच विचार चालू. तर चिरंजीवांनी बोट धरून नेले आणि वाक्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण दिले जणू...


आमच्या हातात त्याचा चिमुकला हात धरून गॅलरीत जाऊन पावसाच्या हलक्या सरींमध्ये भिजायचं होतं त्याला. तेही 'अंबेला' घेऊन! 


तीच हो ती "U for Umbrella" 😃🤗


- मधुरा


#mihirtales

मकरसंक्रांत २०२४

मकरसंक्रांत २०२४


सूर्यदेवाचे  उत्तरायण 🌞

मकरसंक्रांतीचा आला  सण .. 

बोरं  ऊस  हरभरे  गाजर  भरून 🥕

सुगडे  बसली तयार होऊन .. 

पतंग गेला  उंच आकाशी 🪁

वडीवर  शोभे  तिळाची  नक्षी .. 

रंगीत  शुभ्र  काटेरी  हलवा ✨

गुळाची  पोळी  तुपात  भिजवा .. 

काळी  साडी ,तिळगुळाची  वडी 🖤

स्नेहबंध  जपत  वाढो नात्यांची  गोडी .. 


मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻


-गालफाडे परिवार

निमंत्रण

घर नोहे नुसते 

जपले वास्तुने घरपण

माणसांची रेलचेल सदैव

स्वागता आतुर अंगण

जुनी टाकुनी कात

झाले मस्त नूतनीकरण

तीर्थप्रसादास यावे सहकुटुंब

हेच आगत्याचे निमंत्रण..

हवेसे वाटणारे

माझी प्रतिक्रिया ..गौरीच्या लेटेस्ट शॉर्ट्स साठी..डेली रूटीन बघायचंय..साठी—-


गार वाऱ्याची झुळूक, सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश,

कोसळणारा धबधबा, अथांग निळाशार समुद्र,

रंगीत निसर्ग, पावसात न्हाऊन निघालेलं झाड आणि

लांबवर जाणारा नागमोडी रस्ता...

उंचच उंच डोंगर... बर्फाची झाकणे ठेवल्यासारखे...

गर्द काळ्या आकाशात गोल गरगरीत चांदोबा आणि

लुकलुकणारी चांदणी..

कधीतरी nostalgic होऊन बालपणीच्या आठवणी..

कधी अंगण, घर, परसबाग आणि गृह सजावट

तर कधी पदार्थ, सौंदर्य आणि बिल्लूची करामत

सगळंच भरभरून पाहायचंय तू टिपलेल्या कॅमेरात...

आणि मनसोक्त ऐकायचंय, वाचायचंय तुझ्या

ओघवत्या शब्दांत..❤🌈

मनमुराद जगलेलं बालपण

☺️मनमुराद जगलेलं बालपण☺️


धुणं धुताना थंडगार पाण्याचे उडणारे छोटेसे तुषार आणि कपड्यांचा आवाज..

नऊवारी पातळ काठीने एका सरळ रेषेत 

वाळत घालताना आजी आठवते आज..👵🏻


झाडून स्वच्छ केलेलं मातीचं अंगण

पाण्याचा तांब्या विशिष्ट पद्धतीने धरून केलेलं सडा-संमार्जन

रांगोळीचे ठिपके यायचेच की आपोआप ओळीत

फ्री-हँड्स वगैरे नव्हतं हं त्या रांगोळीत..✨


सर्व प्रकारची फुलं, पत्री अन् दूर्वा एकत्र एका परडीत तर कधी फ्रॉकच्या ओटीत

मधेच दिसली एखादी माऊ तर आईकडे हट्ट…

आई दे ना गं माऊसाठी दूध वाटीत🐱


सायन्स, टेक्नोलॉजी, गॅजेट्स स्वीकारत मोठे झालोय आणि होतोय आपण..

पण कधीतरी स्वस्थ बसून विचार केला की डोकावतं….

मनमुराद जगलेलं बालपण☺️


   ——-✍🏾मधुदीप