सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

दिवाळी

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔


मातीच्या ,रंगवलेल्या ,काचेच्या अन मेणाच्या ,

शांत तेवणारी ज्योत कवेत घेणाऱ्या ,

जमिनीवर राहून आकाशाकडे प्रकाश देणाऱ्या ,

रांगोळीत विराजमान होऊन अंगण उजळणाऱ्या ,

नाजूकश्या पणत्या ... 🪔


झिरमिळ्यांचे ,षट्कोनी, खणाचे trendy ,

स्वतःच्या हाताने घरीच केलेले छोटेसे handy ,

रांगोळीच्या बरोब्बर वर टांगलेले ,

वाऱ्याच्या झुळूकेवर अलगद झुलणारे ,

ठसकेबाज आकाशकंदील ... 🏮


आकाशात झेपावणारे ,नभी उजळणारे ,

जमिनीवर प्रकाशाची रांगोळी रेखणारे ,

नानाविध आकाराचे,आवाजाचे,शोभेचे,

छोट्या-मोठ्यांच्या आवडीचे ,

दणकेबाज फटाके ... 🎇


गरम तेलाच्या डोहात विसावणारी,

वेटोळाकार काटेरी चकली ,

काजू-बेदाण्यातून smiley face करून ,

चवीने भुरळ पडणारा गरगरीत बेसन लाडू ,

कातण्याने कातून आकार मिरवणाऱ्या 

खाऱ्या-गोडया शंकरपाळ्या , करंज्या ,

शेंगदाणे,खोबरे,डाळं,कढीपत्ता ,पोहे 

सगळ्यांना आपलासा करणारा चिवडा ,

खसखशीची पावडर लावणारे अनारसे ,

एकातून अनेक पदर असलेले चिरोटे 

असा चविष्ट फराळ ... 🧆


सूर्याला साद घालणारी पहाट ,

चार कोपऱ्यात रांगोळीने सजलेला पाट ,

चंदनाचं सुवासिक उटणं ,

हातात न मावणारा गोलूमोलू मोती साबण ,

आई-आजीच्या हातून वासाच्या तेलाने 

केला जाणारा अभ्यंग आणि औक्षण ,

आणि 

देवापुढे समई - उदबत्तीच्या साक्षीने 

नतमस्तक होणारे आपण ... 🙏🏻


रम्य वातावरणात,जल्लोषात,धूमधडाक्यात 

साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या परंपरेला जपत ,

सर्वांच्या आरोग्य ,आनंद,सुख,समाधान,शांती साठी 

प्रार्थना करूया ... 👏🏻


दिवाळी २०२१ च्या खूप शुभेच्छा !!🎉


- मिहिर ,मधुरा ,तुषार

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा