सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

मनमुराद जगलेलं बालपण

☺️मनमुराद जगलेलं बालपण☺️


धुणं धुताना थंडगार पाण्याचे उडणारे छोटेसे तुषार आणि कपड्यांचा आवाज..

नऊवारी पातळ काठीने एका सरळ रेषेत 

वाळत घालताना आजी आठवते आज..👵🏻


झाडून स्वच्छ केलेलं मातीचं अंगण

पाण्याचा तांब्या विशिष्ट पद्धतीने धरून केलेलं सडा-संमार्जन

रांगोळीचे ठिपके यायचेच की आपोआप ओळीत

फ्री-हँड्स वगैरे नव्हतं हं त्या रांगोळीत..✨


सर्व प्रकारची फुलं, पत्री अन् दूर्वा एकत्र एका परडीत तर कधी फ्रॉकच्या ओटीत

मधेच दिसली एखादी माऊ तर आईकडे हट्ट…

आई दे ना गं माऊसाठी दूध वाटीत🐱


सायन्स, टेक्नोलॉजी, गॅजेट्स स्वीकारत मोठे झालोय आणि होतोय आपण..

पण कधीतरी स्वस्थ बसून विचार केला की डोकावतं….

मनमुराद जगलेलं बालपण☺️


   ——-✍🏾मधुदीप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा