एक होती नाजूक कळी
पानांच्या कोनात दडलेली,
दवबिंदूच्या स्पर्शाने
उमलण्यास आतुरली
हलका गुलाबी रंग तिचा
पाकळ्यांनी गर्दी केली,
निद्रावस्थेतली ती
भ्रमर स्पर्शाने जागी झाली
फूल होताच तिचे
पानांतही कुजबूज झाली,
स्तुती ऐकताक्षणी
कळी थोडी बावरली
आनंदी आयुष्य जगली
इतक्यात कोणी तिला खुडली,
आता पानांमध्ये नसलेली ती
आतून दुखावली
श्रीगणेशाच्या चरणी
कोणी तिला वाहिली,
पूर्वीची ती नाजूक कळी
देवाशी एकरूप झाली
Khupach sundar.Manala ekdum bhidali.
उत्तर द्याहटवाapratim
उत्तर द्याहटवाकविता "ठीक" आहे, परंतु त्यातील आशय छान आहे.
उत्तर द्याहटवाअष्टाक्षरीत बांधली असती, तर अप्रतिम सुंदर झाली असती.